बातम्या
आजरा महावितरण उपविभागाची जवळपास शंभर टक्के वसुली पूर्ण
By nisha patil - 2/4/2026 10:10:49 PM
Share This News:
**आजरा महावितरण उपविभागाची जवळपास शंभर टक्के वसुली पूर्ण*
**आजरा (हसन तकीलदार)*:-महावितरण आजरा उपविभागाने 2025-26 च्या आर्थिक वर्षासाठी वीज देयक वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत जवळ जवळ शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. .
सदर वीज देयक वसुली कामकाज कार्यकारी अभियंता गडहिंग्लज विभाग एस. के.पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपकार्यकारी अभियंता आजरा दयानंद अष्टेकर यांचे कुशल नेतृत्वात तसेच सर्व जनमित्र, शाखा अधिकारी, बिलिंग अधिकारी कर्मचारी यांचे अथक परिश्रम व प्रयत्न यामुळे शक्य झाले आहे .
महत्वाचे म्हणजे सर्व सन्माननीय वीज ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करून या कामगिरी मध्ये मोलाचा वाटा उचलला आहे . सदरील आर्थिक वर्षामध्ये महावितरण आजरा उपविभागाने 99.13 % विज देयक वसुली केली आहे .
सोबतच आजरा उपविभागातील सर्व गावे मार्च 2026 साठी थकबाकी मुक्त केलेली आहे. कार्यकारी अभियंता एस. के.पोवार यांच्यामार्फत या सर्व शाखा कार्यालयाला भेट देऊन सर्व जनमित्र , शाखा अभियंता या सर्वांना झाडाचे रोप देऊन यथोचित सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे .
तसेच सदर झाड लावून त्याची जपणूक करून आपण मार्च 26 महिन्यात केलेल्या मेहनतीचे ह्या झाडाच्या रूपाने आठवण ठेवता येईल असे सर्वांना संबोधित केले.
आजरा महावितरण उपविभागाची जवळपास शंभर टक्के वसुली पूर्ण
|