बातम्या
आजरा नगरपंचायतीतील अधिकृत व अनाधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी*
By nisha patil - 6/16/2026 8:06:24 PM
Share This News:
*आजरा नगरपंचायतीतील अधिकृत व अनाधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी*
**आजरा(हसन तकीलदार)*-: सामाजिक सेवा प्रतिष्ठान, आजरा प्रणीत अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करावा तसेच अनधिकृत नळजोडण्या नियमानुसार नियमित करण्याबाबतचे निवेदन आज दिनांक १६/६/२०२६ रोजी आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे व मुख्य ठेकेदार आर. डी. देसाई यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), डॉ.सौ. स्मिता कुंभार (परळकर) तसेच अन्याय निवारण समितीचे पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, दिनकर जाधव, मिनीन डिसोझा, जावेदभाई पठाण पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख मानसी कदम,उत्तम कांबळे (सुपरवायझर) व इतर सदस्य उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,शहरातील सर्व अधिकृत, अनधिकृत व घरगुती नळजोडण्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्याची स्वतंत्र नोंद तयार करावी, अनधिकृत नळजोडण्या नियमांनुसार नियमित करून नगरपंचायतीच्या महसुलात वाढ करावी तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांना या संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वेक्षण करून आवश्यक अहवाल सादर करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे आजरा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक पारदर्शक होऊन अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
आजरा नगरपंचायतीतील अधिकृत व अनाधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी*
|