बातम्या

आजरा तालुका काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात जोरदार आंदोलन

Ajra oil


By nisha patil - 5/21/2026 11:05:45 PM
Share This News:



**आजरा तालुका काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात जोरदार आंदोलन*

**आजरा(हसन तकीलदार)*:-सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा घालून इंधन दरवाढी केल्याच्या विरोधात आजरा तालुका कॉग्रेसच्या वतीने आंबोली रोड, आजरा येथिल मिनर्वा पेट्रोल पंप येथे दि. 21/5/2026 रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले.

देशात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईचा तीव्र निषेध नोंदवण्या करिता आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन करण्याचे निश्चीत झाल्याने, आजरा तालुका काँग्रेसच्या वतीने आजरा येथील मिनर्वा पेट्रोल पंप येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

वाढत्या इंधन दरामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली असून, याचा थेट फटका शेतकरी, कष्टकरी जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या बजेटला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

**आंदोलनाची प्रमुख वैशिष्ट्ये*

थेट पेट्रोल पंपावर नागरिकांना पत्रक वाटून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. वाढत्या इंधनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधातजोरदार घोषणाबाजी केली.

'पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करा', अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनामध्ये आजरा नगरपंचायतचे गटनेते अभिषेक जयवंतराव शिंपी, नगरसेवक असिफ पटेल, नगरसेवक निसार लाडजी, नगरसेवक असिफ सोनेखान, नगरसेवक विक्रम पटेकर, सामाजीक कार्यकर्ते इब्राहीम इंचनाळकर, अमित खेडेकर,सुफियान खेडेकर, मुज्जमिल खेडेकर तसेच कॉग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजरा तालुका काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात जोरदार आंदोलन
Total Views: 291