बातम्या

आजपर्यंत दुर्लक्षित पटेल कॉलनीत विकासकामांची सुरुवात* 

Ajra patel colony


By nisha patil - 2/17/2026 11:45:47 PM
Share This News:



**आजपर्यंत दुर्लक्षित पटेल कॉलनीत विकासकामांची सुरुवात* 

आजरा (हसन तकीलदार )**:-आजरा नगरपंचायत हद्दीमधील दुर्लक्षित अशा पटेल कॉलनीमध्ये विकास कामाची गंगा वाहू लागली असून नवनिर्वाचित नगरसेवक भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिकेत अशोक चराटी यांनी आज विविध विकास कामांची सुरुवात व घोषणा केली. पटेल कॉलनी ही आजरा शहराच्या एका बाजूला राहत असल्यामुळे नेहमीच या वस्ती वरती विकास कामांच्या बाबतीत थोडेसे दुर्लक्ष होत होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरसेवक अनिकेत चराटी यांनी निवडणुकीदरम्यान प्रचाराच्या वेळी येथील नागरिकांना काही शब्द दिले होते काही वचने दिली होती त्याच्या पूर्ततेला सुरुवात झाली

 

असून आज येथे विकास कामांचे उद्घाटने व पुढील विकास कामांची दिशा अनिकेत यांनी सर्वांसमोर विशद केली.त्यामुळे येथील जनतेने देखील आपल्याला कामाचा नगरसेवक मिळाला असल्याची बोलून दाखवले.

    पटेल कॉलनी घरफळा, दिवाबत्ती कर, अशी कर आकारणी नगरपंचायत करीत होती परंतु मूलभूत सुविधापासून पटेल कॉलनी आजपर्यंत वंचित होती. पाणी सुद्धा बुरुडे ग्रामपंचायती कडून घ्यायची वेळ आली होती. परंतु या सर्व समस्या दूर करण्यासाठी नूतन नगरसेवक अनिकेत चराटी यांनी पुढाकार घेत पटेल कॉलनीत विकासाची कामे सुरु केली आहेत.

या वेळी नवीद पटेल,समीर तकिलदार ,नजीम माणगावकर ,आस्लम पटेल,शौकत वंटमुरे,जावेद वाडीकर,असिफ पटेल,खलील मुजावर,नूर दरवाजकार,शकील चांद,इम्रान पटेल, जावेद पटेल, फिरोज पटेल, राहमतुल्ला नेसरीकर , सिद्धिक वंटमुरे , रेहान पटेल,आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते.

यावेळी अनिकेत चराटी यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांच्या कार्यकाळात शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून गत पाच वर्षांमध्ये कोरोना व नवीन नगरपंचायत मान्यतेमुळे पदाधिकारी उपलब्ध नसल्याने मनाजोगे काम करता आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली व या पाच वर्षात आजरा शहर एक रोल मॉडेल बनवून आजरा शहराचा आदर्श राज्यातील इतर शहरानी घ्यावा असा कारभार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आजपर्यंत दुर्लक्षित पटेल कॉलनीत विकासकामांची सुरुवात* 
Total Views: 7