राजकीय
आज अखेर आजरा तालुक्यात जिल्हा परिषदसाठी 6 तर पंचायत समितीसाठी 8 अर्ज दाखल*
By nisha patil - 1/20/2026 11:31:37 PM
Share This News:
आज अखेर आजरा तालुक्यात जिल्हा परिषदसाठी 6 तर पंचायत समितीसाठी 8 अर्ज दाखल*
आजरा(हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 6 तर पंचायत समिती 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दोन जिल्हा परिषदेसाठी 44 तर 4 पंचायत समितीसाठी 55 असे अर्ज विक्री झाले आहेत.
उत्तूर जिल्हा परिषद साठी शिरीष हिंदूराव देसाई,विठ्ठल महादेव उत्तूरकर (प्रत्येकी एक)अर्ज दाखल केले आहेत आणि पेरणोली जिल्हा परिषदेसाठी सुधिर राजाराम देसाई यांनी (२)अर्ज,सुरेश कृष्णा शिंगटे,सुपल सुधीर रामदास, रणजीतकुमार सुर्यकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)अर्ज दाखल केले आहेत.
उत्तूर पंचायत समितीसाठी
विकास वसंत चोथे,चंद्रकांत ईश्वर गोरुले (प्रत्येकी एक)तर भादवण पंचायत समिती साठी सौ.विजया जर्नादन निऊंगरे यांनी(२)
पेरणोली पंचायत समितीसाठी
सौ.यशोदा युवराज पोवार,सौ.रचना राजाराम होलम,सौ.श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)
वाटंगी पंचायत समितीत
किरण विश्वनाथ कोरे,भिमराव गणपती वांद्रे (प्रत्येकी एक)
असे अर्ज आज अखेर भरणेत आले आहेत.
आज अखेर आजरा तालुक्यात जिल्हा परिषदसाठी 6 तर पंचायत समितीसाठी 8 अर्ज दाखल*
|