बातम्या
आजऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची तुफान बॅटिंग
By nisha patil - 7/5/2026 7:31:49 PM
Share This News:
आजऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची तुफान बॅटिंग
**आजरा(हसन तकीलदार)*:-आज दि. 7 मे रोजी सकाळपासून आकाश निरभ्र होते. तापमान वाढले होते. अंगाची लाही लाही होत होती. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे लग्नघटिकाच्या धावपळीत नातेवाईक पाहुणे पै होते आणि दुपारी अचानक मेघ दाटून आले विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसहीत पावसाला सुरवात झाली.
दिवसभर तापलेल्या धरणीला पावसाच्या सरीनी अलींगन देत धरतीला थंड केले. कस्तुरीसारखा मातीचा सुवास दरवळू लागला अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि वातावरण अगदी आल्हादायक झाले. लग्नसराईत आलेल्या पाहुणे मंडळींची धावपळ झाली. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी मंडप पडले. त्यामुळे ज्यांची लग्ने होती ती मंडळी नाराज झाली. पावसाच्या सरी सुरु होताच बालचमुनी अंगावर सरी घेत पावसात भिजण्याचा आनंद घेतला. दुपारी पावणे दोनला सुरु झालेला पाऊस साधारणपणे पावणे तीन ते तीन वाजेपर्यंत सुरु होता. बाजारपेठेतील बुरुड कॉर्नर ते छत्रपती संभाजी चौकापर्यंत तसेच मॉर्निंग स्टार समोरील महामार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी निचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विजेच्या कडकडाटामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उशिरापर्यंत लाईट गुल झाली होती. परंतु विजकर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सायंकाळी साडेसहा वाजता लाईट आली.
आजऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची तुफान बॅटिंग
|