बातम्या

आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण ऊस बिले व तोडणी-वाहतुक बिले जमा*

Ajra sakhar 1


By nisha patil - 2/4/2026 7:10:33 PM
Share This News:



**आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण ऊस बिले व तोडणी-वाहतुक बिले जमा*

 

**आजरा(हसन तकीलदार )**:-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 या हंगामात 105 दिवसात 3,06,880.606 मे.टन ऊसाचे गाळप झाले असुन 3,63,225 क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे दि.16.01.2026 ते 16. 02.2026 अखेर गाळप झालेल्या 81,701.441 मे. टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू. 3400/- प्रमाणे विनाकपात होणारी रक्कम रू.27 कोटी 78 लाख व तोडणी वाहतुक बिलाची संपुर्ण रू.2 कोटीची रक्कम .हसन मुश्रीफ (वैद्यकिय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई) व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी दिली.

    सन 2025-26 या संपलेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने ठेवलेले गाळपाचे उदिष्ठ पुर्ण करणे अति पावसामुळे ऊसाच्या उत्पन्नात व साखर उता-यात झालेली घट त्याचबरोबर यावर्षी परभागातील अपुरी आलेली तोडणी यंत्रणा यामुळे शक्य झाले नाही. तरी देखील व्यवस्थापनाने 3 लाख 7 हजारपर्यंत ऊसाचे गाळप केलेले आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील अति पावसामुळे निकृष्ट प्रतिचा ऊस परिणामी कारखान्याने जादा तोडणी वाहतूक खर्च करून गळीतास आणुन शेतक-यांची अडचण दूर केली आहे.

 

कारखान्याचे संचालक मंडळाने येणारा सन 2026-27 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सक्षम तोडणी-वाहतुक यंत्रणा भरणेसाठी करार करणेचे काम सुरू आहेत. पुढील हंगामासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, आंबोली या भागातील ऊस उत्पादक शेतक-यांचे ऊस नोंदी व कराराचे कामही सुरू केले आहे. ज्या शेतक-यांनी अद्याप ऊसाचे करार केलेले नाहीत त्यांनी संबंधीत शेती सेंटर ऑफिसशी संपर्क साधून आपले करार करावेत. त्याच बरोबर आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील आजरा कारखान्याकडे काम करू इच्छिणा-या उस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी आपल्या वाहन व मजुरांचे तोडणी वाहतुकीचे करार मुदतीत करावेत असे आवाहन चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके,कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर,उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिरभाऊ देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, हाजी रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के. सावंत व अधिकारी उपस्थित होते.


आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण ऊस बिले व तोडणी-वाहतुक बिले जमा*
Total Views: 360