बातम्या

आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप होणार

Ajra sakhar karkhana


By nisha patil - 11/4/2026 3:02:44 PM
Share This News:



आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप होणार

आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने नुकताच निर्णय घेवून कारखान्याकडे रू. 15,000/- शेअर्स रक्कम असणा-या अ व ब वर्ग सभासदांना प्रत्येकी 50 किलो साखर, शेअर्स रु.10,000/- जमा असलेल्या सभासदांना प्रत्येकी 25 किलो तर शेअर्स रक्कम रु.7,000/- जमा असणा-या सभासदांना प्रत्येकी 15 किलो साखर त्याचप्रमाणे कारखान्याच्या सन 2025-26 गळीत हंगामात गळीतासाठी ऊस पुरवठा केलेल्या ऊस पुरवठादारांना प्रतिटन अर्धा किलो साखर प्रति किलो रू.25/- प्रमाणे सवलतीच्या दरात दि. 16.04.2026 ते दि. 15.05.2026 या कालावधीत वाटप केली जाणार आहे.

पात्र सभासदांनी साखर कार्ड घेणेसाठी व ऊस पुरवठादारांनी टनेज साखर उचल करतांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स त्यावर सही करून देणे अत्यावश्यक आहे. यामधील सभासद साखर व कार्यक्षेत्रातील टनेज साखर आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या तालुक्यातील संबंधीत शाखा मधुन वाटप केली जाईल तर गेटकेनची गडहिंग्लज, चंदगड, कर्नाटक, आंबोली, गारगोटी मधुन आलेल्या ऊसाची टनेज साखर कारखाना कार्यस्थळावरून वाटप केली जाणार आहे.

आजरा साखर कारखान्याकडे अपुरी शेअर्स रक्कम असलेल्या सभासदांनी साखर वाटप कालावधीत अपूर्ण शेअर्स रक्कम भरून घेणेची व्यवस्था कारखान्याच्या संबंधित शेती सेंटर ऑफिसमध्ये केलेली आहे. कृपया आपली शेअर्स रक्कम रू.15000/- रु.10000/- किंवा कमीत कमी रू.7000/- पुर्ण करून कारखान्याचे धोरणाप्रमाणे साखर वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके, कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णु केसरकर,उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई,संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर,राजेंद्र मुरूकटे,राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के.सावंत व अधिकारी उपस्थित होते.


आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप होणार
Total Views: 122