बातम्या
आजरा साखर कारखान्यात मिल रोलरपुजन उत्सहात*
By nisha patil - 2/7/2026 10:50:04 PM
Share This News:
**आजरा साखर कारखान्यात मिल रोलरपुजन उत्सहात*
**आजरा(हसन तकीलदार)*:-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर-गवसे, ता. आजरा, जि. कोल्हापूर.येथे सन 2026-27 गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू झाले असून कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज मील रोलर पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी येत्या सन 2026-27 चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर, 2026 मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम 2026-27 करीता 7,700 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. येत्या गळीत हंगामात 4 लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. 30 सप्टेंबर 2026 पुर्वी कारखाना दुरुस्ती व देखभालीची कामे पुर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. येणा-या गळीत हंगामासाठी सक्षम 385 परजिल्हयातील व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली असुन सदर यंत्रणेस पहिल्या ऍडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापनामार्फत केले जात आहे अशी माहिती दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई,मारूती घोरपडे,सुभाष देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई तसेच कार्यकारी संचालक एस.के.सावंत, जनरल मॅनेंजर (टेक्नि) एम.आर.पाटील, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, चिफ केमिस्ट सुजय पाटील, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, एच.आर. मॅनेजर सुभाष भादवणकर,अधिकारी, युनियन अध्यक्ष,युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्यात मिल रोलरपुजन उत्सहात*
|