बातम्या

आजरा साखरच्या काॅलनीत झाड पडून लाखोंचे नुकसान*

Ajra sugar colany


By nisha patil - 8/7/2026 9:46:58 AM
Share This News:



*आजरा साखरच्या काॅलनीत झाड पडून लाखोंचे नुकसान*

 **आजरा(हसन तकीलदार!)*:-वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना गवसे येथील कामगार काॅलनीतील बी टाईप बंगल्यावर मंगळवार दिनांक 07 जुलै रोजी सूरू असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने मोठे उंबराचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे बी टाईप बंगल्याचे तसेच 7 विद्युत खांबही मोडून पडले व विज प्रवाह खंडीत झाला आहे.

तसेच कारखाना परिसरात जोपासलेली अनेक झाडे धोकादायक दिसू लागलेने यावर खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना प्रशासनाने तात्काळ निर्णय घेवून उपाययोजना केल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे फॅक्टरी बिल्डिंग वरील काही ठिकाणचे पत्रेही उडाले आहेत. 

      कारखाना परिसरात झालेल्या या आपत्तीची कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई व व्हाईस चेअरमन अनिल फडके यांनी पाहणी केली. या आपत्तीमुळे कारखान्याचे किमान पाच लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. या प्रसंगी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले असलेचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी सांगितले.


आजरा साखरच्या काॅलनीत झाड पडून लाखोंचे नुकसान*
Total Views: 539