बातम्या

आजरा साखरची सभासद व टनेज साखर वाटपास 31 मे 2026 अखेर मुदतवाढ

Ajra sugur factory


By nisha patil - 5/15/2026 12:38:40 PM
Share This News:



*आजरा साखरची सभासद व टनेज साखर वाटपास 31 मे 2026 अखेर मुदतवाढ*

  वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखान्यामार्फत कारखान्याकडे रू.15,000/- ,रू. 10,000/- व रू.7,000/- शेअर्स रक्कम जमा असलेल्या मंजूर सभासदांना अनुक्रमे 50 किलो, 25किलो व 15किलो त्याचबरोबर गळीत हंगाम 2025-26 मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिटन अर्धा किलो साखर सवलतीच्या दरात वाटप करण्याचे काम सुरू आहे.सदर साखर वाटप कार्यक्रम 15 मे अखेर होता तथापी सभासद व ऊस उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या गरजे व आवश्यकतेनुसार कारखाना व्यवस्थापनाने सदर साखर वाटपाची दिनांक 15 मे अखेर असलेली मुदत वाढवून ती दि. 31 मे 2026 करणेत आलेली आहे. 

      सभासदांनी याची नोंद घेवून आपली साखर 31 मे 2026पूर्वी उचल करावी त्याचप्रमाणे अपूरी शेअर्स रक्कम असलेल्या सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रु. 7,000/-, रु. 10,000/- अथवा पूर्ण शेअर्स रक्कम रू. 15,000/- संबंधित शेती सेंटरऑफीस अथवा कारखाना कार्यस्थळावर भरून तालुका संघाच्या संबंधित शाखेतून साखर उचल करावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले.

   **सभासद व ऊस पुरवठादारांनी आपली साखर उचल करताना आधार कार्ड झेराॅक्स जमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे लाभार्थिनी साखर उचल करताना आधार कार्ड झेरॉक्स आणावे असे सांगण्यात आले आहे **


आजरा साखरची सभासद व टनेज साखर वाटपास 31 मे 2026 अखेर मुदतवाढ
Total Views: 8