बातम्या

आंदोलन स्थळी एकही शिक्षक फिरकला नाही हीच मोठी शोकांतिका वाटते-सुनील शिंदे

Ajra teacher andolan


By nisha patil - 12/16/2025 11:06:41 PM
Share This News:



आंदोलन स्थळी एकही शिक्षक फिरकला नाही हीच मोठी शोकांतिका वाटते-सुनील शिंदे*

 आजरा(हसन तकीलदार)*:-नागपूर येथे सुरु असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आरदाळ ता. आजरा येथील लढवय्ये व्यक्तिमत्व असलेले कॉ. शिवाजी गुरव यांनी आजरा तहसील ऑफिससमोर शाळा बचाव आंदोलन केले.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 50%अपंग असलेला एक व्यक्ती दिवसभर बसून होता परंतु आजरा तालुक्यात शेकडोच्या घरात शिक्षकांची संख्या असतानासुद्धा आंदोलनस्थळी एकही शिक्षक फिरकला नाही याचे दुःख मनाला वेदना देऊन जाते असे मत प्राथमिक शिक्षक तसेच शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी सुनील शिंदे यांनी आंदोलन स्थळी भेट दिल्यावर मांडले.

 शिक्षण आणि आरोग्याबाबत सरकारचे धोरणच चुकीचे आहे. सरकारी शाळा टिकल्या पाहिजे, सरकारी शाळा टिकल्या तरच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे, प्रत्येक वर्गाला शिक्षक मिळाला पाहिजे, टी.ई.टी. अट सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्यासाठी शिथिल झाली पाहिजे, पटाआभावी कोणतीही शाळा बंद करू नये. अशा अनेक प्रश्नासाठी एक लढवय्ये व्यक्तीत्व असलेले कॉ. शिवाजी गुरव यांनी आजरा तहसीलसमोर शाळा बचाव आंदोलन केले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सदस्य सुनील शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी त्यांना एकही शिक्षकाने आंदोलन स्थळी भेट दिली नसल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले कि, तालुका आणि शिक्षक संघटना यांचे एक फार मोठे नाते आहे.

या संघटनाच्या माध्यमातून अनेकजण नेते म्हणून पुढे गेले. यातील बरेचजण राज्यनेते म्हणून काम पाहतात. परंतु आज प्राथमिक शिक्षण आणि शाळा वाचवण्यासाठी समाजातील एक व्यक्ती आंदोलन करते आहे आणि तालुक्यात शेकडोच्या घरात शिक्षकांची संख्या असतानासुद्धा आंदोलन स्थळी शिक्षक फिरकलेले नाहीत हे चित्र पाहिल्यावर मनाला खूप वेदना झाल्या.

नोकरीतील अखंड आयुष्य शिक्षकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यात गेले. आता मी सेवानीवृत्तीच्या वाटेवर असताना हे चित्र असेल तर शिक्षकांच्या आणि शाळेच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्याबद्दल समाजात काय संदेश जाईल याची भीती वाटते. असे ते यावेळी म्हणाले. आंदोलनस्थळी कॉ. शांताराम पाटील, युवराज पोवार(तालुका प्रमुख शिवसेना उबाठा),नेताजी साठे, विशाल गुरव, मारुती आप्पा पाटील (कानोली), अशोक आजगेकर(डोणेवाडी), कॉ. संजय घाटगे, विश्वास जाधव(खानापूर)आदिजण उपस्थित होते.


आंदोलन स्थळी एकही शिक्षक फिरकला नाही हीच मोठी शोकांतिका वाटते-सुनील शिंदे
Total Views: 60