बातम्या
आजऱ्यात तीन जणांच्या घरात चोरी
By nisha patil - 6/21/2026 10:58:06 PM
Share This News:
**आजऱ्यात तीन जणांच्या घरात चोरी*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा शहरातील शिव काॅलनी येथे सेवानिवृत्त प्राध्यापकासह तीन जणांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 14 ते 15 लाखांचे ऐवज लंपास केले आहे.यामध्ये प्राध्यापक डॉ नवनाथ शिंदे (सेवानिवृत्त), युवराज जाधव व माध्यमिक शिक्षक संजय भोये यांचा समावेश आहे.ही घटना शनिवारी पहाटे घडल्याची सांगण्यात येत आहे.
शिंदे यांच्या घरातील मंडळी रात्री उशीरापर्यंत जागे होते त्यानंतर ते वरच्या मजल्यावर झोपायला गेले ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत १५ तोळे ६ ग्रॅम सोने,१७ तोळे ५ ग्रॅम चांदी व २० हजाराची रोख रक्कम तर युवराज जाधव यांच्या बंद घरातील ९.५ ग्रॅमचे सोने,३ तोळे वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत.चोरट्यांनी माध्यमिक शिक्षक संजय भोये यांच्या घरासमोर लावलेली ७० हजार किंमतीची मोटरसायकलही लंपास केली आहे.चोरीस गेलेला माल १४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आहे.
आजरा पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले मात्र याचा उपयोग झाला नाही.श्वान भोये यांच्या घरासमोर घुटमळले.चोरटे मोटरसायकलनी पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
आजऱ्यात तीन जणांच्या घरात चोरी
|