बातम्या

आजऱ्याच्या वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात

Ajya forest ranger found in ACBs net


By nisha patil - 5/22/2025 5:05:03 PM
Share This News:



आजऱ्याच्या वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात

पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी अटक.

झाडे तोडण्याचा व वाहतूक करण्याचा अर्ज मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनपाल सागर पांडुरंग यादव याला एसीबीने अटक केलीय.बुधवारी गडहिंग्लज वनपरिमंडळ कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

सध्या आजरा तालुक्यात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामध्ये बाधित होणारी झाडे तोडण्याचे टेंडर तकारदराला मिळालंय.याबाबत बाधित झाडे तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी तक्रारदाराने वनविभागाकडे अर्ज केला होता.हा अर्ज मंजूर करण्यासाठी वनपाल सागर यादव याने ६ हजार रुपये द्यावे लागतील असं तक्रारदाराला सांगितले. तडजोडी अंती पाच हजार रुपये द्यायचे ठरले.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाशी संपर्क साधला. चौकशीत वनपाल सागर यादव यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी गडहिंग्लज येथे परिमंडळ कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आस्मा मुल्ला, सहायक फौजदार अजय चव्हाण, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पोवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे यांच्या पथकाने ही कारवाई केलीय.


आजऱ्याच्या वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात
Total Views: 133