बातम्या
आजरा तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश शिंदे यांची बिनविरोध निवड
By nisha patil - 12/29/2025 4:11:45 PM
Share This News:
आजरा तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश शिंदे यांची बिनविरोध निवड
आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुका नाभिक समाजाची नुकतीच बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आजरा तालुका नाभिक संघटनेची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी आकाश शिंदे, उपाध्यक्ष पदी गौतम भोसले व निलेश साळोखे, सचिव पदी प्रकाश यादव तर खजिनदार पदी रामा पाचवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आकाश शिंदे यांची अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे संघटनेला बळकटी येणार आहे. शांत, संयमी, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले तसेच पत्रकारितेची जाण असलेने संघटनेला याचा पुरेपूर फायदा होणार आहे. यावेळी ते म्हणाले की, अपघातामध्ये अपघाती मृत्यू झालेले कै. संजय यादव यांची इच्छा होती की मी अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळावी. त्यांच्या इच्छेखातर मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. कै. संजय यादव यांची समाजासाठी जी अपेक्षा होती त्यांची ती अपेक्षा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. संपूर्ण नाभिक समाजाला संघटित करून खेड्यापाड्यामध्ये जे नाभिक समाजाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. समाजाची जी पत संस्था आहे ती संस्था सक्षम करून त्याच्या माध्यमातून समाजाची आर्थिक गरज पूर्ण करणार. कै. संजय यादव यांच्या अपघाती मृत्यूमुळे समाजावर संकट ओढवले होते.
समाजासाठी त्यांची जी आत्मीयता आणि तळमळ होती तीच आत्मीयता आणि तळमळ उराशी बाळगून समाजासाठी काम करणार असलेचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब पाचवडेकर, दत्ता पोवार, कृष्णा यादव, रामचंद्र शिंदे, आनंदा इंगळे, प्रकाश पाचवडेकर, निखिल पाचवडेकर, राजू माने, देव पाचवडेकर, हृषीकेश भोसले, निखिल काशीद आदिजण उपस्थित होते.
आजरा तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश शिंदे यांची बिनविरोध निवड
|