आरोग्य
दारू,नशा माणसाला, कुटुंबाला उध्वस्त करते : अॅड. अजय पाठक
By nisha patil - 9/25/2025 2:57:00 PM
Share This News:
कोल्हापूर: दारू, नशिले पदार्थ, नशा माणसाला व कुटुंबालाही उध्वस्त करते. यापासून दूर राहणे हाच त्यावरचा सर्वोत्तम मार्ग आहे असे प्रतिपादन अॅड. अजय पाठक यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने नशा मुक्ती या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते.
अॅड. अजय पाठक म्हणाले, सभ्य संस्कृती ज्यावेळी तयार झाली त्यावेळी पासून हे नशिले पदार्थ,दारूही आली आहे. पूर्वी अपवादातून परिस्थितीमध्ये क्वचित स्वरूपात दारू पिणाऱ्यांची संख्या होती. परंतु ती आता खूप वाढलेली आहे. दारूपेक्षा सुद्धा घातक अशा नशिल्या पदार्थांचे सेवन कमी वयातील विद्यार्थी करताना दिसतात.
पंधरा वर्षाखाली 9% मुले आणि एक टक्के मुलीही आज ह्या नशेच्या आहारी गेलेले आहेत.मॉडर्न संस्कृतीच्या नावाखाली आपली स्वतःचीच फसवणूक यामध्ये होते. वास्तवापासून दूर जाण्याची पळवाट म्हणून माणूस दारूकडे , नशिले पदार्थाकडे वळतो. नंतर त्यात बुडून जातो आणि संपतो. त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक फरफट होते, हेळसांड होते. त्यापासून दूर राहणे हाच उपाय आहे. जे लोक याच्या आहारी गेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नशा मुक्ती उपक्रम, चळवळ सुरू आहे .अशा लोकांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन या लोकांचे प्रबोधन अशा नशा मुक्ती उपक्रमाद्वारे करणे गरजेचे आहे. त्यातूनही दारू सुटू शकते .
भारतातील बारा कोटी लोक आज या नशिले पदार्थाच्या,वाईट व्यसनाच्या नादी लागलेले आहेत. त्यांना दूर करणे गरजेचे आहे. चांगले शिकलेले लोक ही यात अडकलेले आहेत .त्यातून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी आयआयटी पदवीधर कसा भिकेकंगाल झाला. नोकरीला मुकला, उकरणडयावरच खाऊ लागला आणि त्याच्या मित्राने त्यांला त्यातून कसे बाहेर काढले, अति उच्च पदावर परत तो कसा विराजमान झाले याचे उदाहरण दिले.
प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी एन एस एस चे महत्व आणि यातून सामाजिक जाणीव जागृती कशी होते याची माहिती दिली. तसेच नशा मुक्ती संदर्भातील आपले अनुभव कथन केले.
ते म्हणाले, वाईट मित्रांच्या संगतीने आम्हीही चुकलो होतो.परंतु मुक्तांगण सारख्या संस्थेने, चांगल्या माणसानी आम्हाला सावध करून व्यसनांपासून दूर केले.यासाठी कुटुंबाची साथ महत्त्वाची असते. कॅन्सर, मधुमेह,बीपी, अशा रुग्णांकडे पण सहानुभूतीने पाहतो.मात्र दारुड्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहतो ते चुकीचे आहे .अशा लोकांनाही सावरण्याची संधी आपण दिली पाहिजे व त्यांना नशा मुक्ती केंद्र, चळवळ यांच्या माध्यमातून त्याचे दुष्परिणाम सांगून त्याचे परिवर्तन करणे गरजेचे आहे. ते होऊ शकते असे आमचे अनुभव आहेत.
दारू ,बियर नशिले पदार्थ याच्यापासून दूर राहणे साठी पहिल्यांदा ते घेऊच नयेत हे अतिशय उत्तम. ते कुणाच्या दबावाखाली घेतले तर पुन्हा आपण त्यात वाहत जातो, कुटुंबाची राखरांगोळी होते
. त्यातून सोडवण्यासाठी पुन्हा मोठी कसरत करावी लागते .त्यामुळे अशा निशिल्या पदार्थापासून दूर राहणे, त्याच्या दुष्परिणाम बाबत प्रबोधन करणे हे महत्त्वाचे कार्य आहे एन एस एस विभाग व इतर स्वयंसेवी संस्था हे काम करतात. हे मोठे कार्य आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.विजय देठे व प्रा. संतोष कांबळे यांनी संयोजन केले. कुमारी मानसी तराठे हिने सूत्रसंचालन केले .वैभव बागडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.कुमारी सिद्धी पाटील यांनी आभार मानले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह निमित्त समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई यांचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले. ते म्हणाले की भारताच्या राष्ट्र निर्मितीमध्ये 560 संस्थाने विलीन करून सरदार वल्लभाई पटेल यांनी भारत एक संघ केला. ते राष्ट्राच्या एकीकरणाचे शिल्पकार होते. प्रखर देशभक्ती, राजनैतिक कौशल्य आणि धाडसी निर्णय व कार्यकुशलता याद्वारे त्यांनी देश एकसंध बांधला.लोकांचा ते आवाज बनले आणि लोक हातासाठी ते अखंडपणे कार्यरत राहिले.
मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दीपक कुमार वळवी यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन व कार्य यावर व्याख्यान दिले .
एन एस एस सप्ताह निमित्त निबंध स्पर्धा, स्वच्छता मोहीम, नशा मुक्त जनजागृती अभियान रॅली संपन्न झाली. डॉ. विजय देठे व प्रा. संतोष कांबळे यांनी या सप्ताहाचे संयोजन केले.
दारू,नशा माणसाला, कुटुंबाला उध्वस्त करते : अॅड. अजय पाठक
|