ताज्या बातम्या
लाल किल्ल्याबाहेर स्फोटानंतर कोल्हापूरमध्ये अलर्ट; शहरात बंदोबस्त कडक
By nisha patil - 12/11/2025 11:09:14 AM
Share This News:
कोल्हापूर:- दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर सोमवारी सायंकाळी वाहनांमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आणि शहरातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
शहरातील अंबाबाई मंदिर, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सर्किट बेंच आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गस्ती पथकांनाही बळकटी देण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाल किल्ल्याबाहेर स्फोटानंतर कोल्हापूरमध्ये अलर्ट; शहरात बंदोबस्त कडक
|