बातम्या
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या क्रीडास्पर्धा
By nisha patil - 4/17/2025 4:22:06 PM
Share This News:
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या क्रीडास्पर्धा
१७ ते १९ एप्रिल दरम्यान होणार स्पर्धा : १००० खेळाडूंचा सहभाग
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४६ व्या क्रीडा स्पर्धा १७ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात होणार आहेत. यामध्ये ऍथलेटिक्स, कॅरम आणि व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. स्पर्धेचे आयोजन महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. देशभरातून सुमारे एक हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप व पारितोषिक वितरण १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्टृ राज्य कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते होईल.
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या क्रीडास्पर्धा
|