कृषी

आखिल भारतीय किसान सभा करणार बेमुदत ठिय्या आंदोलन

All India Kisan Sabha to hold indefinite sit in protest


By nisha patil - 4/1/2026 11:20:24 AM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होणार असलेबाबत आखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक कॉ. संग्राम सावंत यांनी सांगितले.

अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या वतीने आरळगुंडी येथील तिमाजीनगर मधील बेकायदेशीररित्या घरापाठीमागील जागा व जमीन खोदून रस्ता करणाऱ्या आणि लोकांची झाडे व इतर नुकसान करणाऱ्यांवर तसेच सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गारगोटी यांनी आरळगुंडी गावातील तिमाजीनगर मधील लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच आरळगुंडी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासह एकूण 56  मागण्यांबाबतीत मंगळवार दि.6/01/2026 रोजी पासून गारगोटी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलान होणार आहे. 
या संदर्भातील निवेदन विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे ;मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर;  गटविकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड आणि पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गारगोटी यांना यापूर्वी अनेक वेळा निवेदने आरळगुंडी ग्रामपंचायतच्या संदर्भात दिलेली आहेत. या बाबतीत चौकशी समिती नेमून सखोल चौकशी झाली पाहिजे.

अशी अखिल भारतीय किसान सभा या संघटनेची भूमिका आहे.आरळगुंडी ग्रामपंचायतीने 15 वा. वित्त आयोगातून सन-2020-2021 ते सन-2024-2025 आजपर्यंत गाव विकास आराखड्यामध्ये कोणकोणती कामे झाली त्या कामावरील बजेट किती होते ते कायदेशीररित्या खर्च झाले आहे का? याची सखोल व बीनचूक चौकशी व्हावी.आरळगुंडी येथील तिमाजीनगर मधील बेकायदेशीररित्या घरापाठीमागील जागा व जमीन खोदून रस्ता करणाऱ्या आणि लोकांची झाडे व इतर नुकसान करणाऱ्यांवर तसेच सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.असे या निवेदनात म्हटले आहे
निवेदनातील एकूण 56   मागण्यांच्या संदर्भात गटविकास अधिकारी  गंभीरपूर्वक दखल घेऊन चौकशी करून सविस्तर अहवाल अखिल भारतीय किसान सभा या संघटनेला मिळावा. तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गारगोटी यांनी आरळगुंडी गावातील तिमाजीनगर मधील लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.यासाठी गारगोटी पंचायत समिती, गारगोटी कार्यालयासमोर  मंगळवार दि.6/01/2026 रोजी पासून "बेमुदत ठिय्या आंदोलन" करणार असलेबाबत निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कॉ.संग्राम सावंत   (समन्वयक -अखिल भारतीय किसान सभा )
ॲड.दशरथ दळवी,मेघाराणी भाईंगडे ,धनाजी शेटके, युवराज पाटील, मारूती पाटील,उत्तम कांबळे,सुनिल जाधव, दयानंद पाटील, विनोद देवेकर,गीता पाटील,शाहूबाई देवेकर, मीना पाटील,बयाबाई पाटील, कृष्णा शेटके,रंजना पाटील,  मारूती पाटील,अश्विनी कांबळे, सुप्रिया देवेकर, पुजा पाटील व आरळगुंडी ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.


आखिल भारतीय किसान सभा करणार बेमुदत ठिय्या आंदोलन
Total Views: 343