बातम्या
विश्वास (आबाजी) पाटील यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार;
By Administrator - 11/4/2025 3:55:21 PM
Share This News:
विश्वास (आबाजी) पाटील यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार;
अमृतविश्व गौरव अंकाचे प्रकाशन मा.मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आदरणीय विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांचा भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार आणि अमृतविश्व गौरव अंक प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.
या विशेष सोहळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृह व ऊर्जामंत्री तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असून, या कार्यक्रमास पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री प्रकाश आबिटकर, आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांतील आणि क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक: एम. अरुण गणपतराव डोणले – अध्यक्ष, मा. विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सव समिती सचिन विश्वासराव पाटील – कार्यकर्ता
विश्वास (आबाजी) पाटील यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार;
|