बातम्या
स्मार्ट मीटर सक्ती विरोधात जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर एक जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चा ...
By nisha patil - 6/18/2025 9:48:13 PM
Share This News:
स्मार्ट मीटर सक्ती विरोधात जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर एक जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चा ...
आज स्मार्ट मीटर संदर्भात राज्यभर विरोध होत असताना सुद्धा बळजबरीने कोणत्याही ग्राहकाची मागणी नसतानासक्तीने स्मार्ट मीटर बसवली जात आहेत ती थांबवावी सोलर शक्ति रद्द करावी शेती पंप अनुदान अधिकार घोळ थांबवावा त्या ठिकाणी जुनी मीटर बसवावीत शेतीपंपासाठी सोलर शक्ती रद्द करावी या बाबतीत चार वाजता जयसिंगपूर विभागीय कार्यालयामध्ये आज बैठक झाली
यावेळी कार्यकारी अभियंता विजय आडके तसेच अदानी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे अधिकारी अभिजीत कदम यांना धारेवर धरण्यात आलं ग्राहकांची मागणी नसताना स्मार्ट मीटर अजिबात बसवायची नाहीत जुनी डिजिटल मीटर सुस्थितीत असताना हा भार महावितरण वर टाकू नका
आणि स्मार्ट मीटर सक्ती ताबडतोब थांबवा महावितरण चा मीटर काढून अदानी एनर्जी लिमिटेड चा स्मार्ट मीटर अजिबात स्वीकारला जाणार नाही
अदानी एनर्जी लिमिटेड च्या कोणत्याही माणसाला तालुक्यात फिरू दिले जाणार नाही ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या ठिकाणी जनतेने कायदा हातात घेऊन काही घडल्यास त्याला सर्वस्वी अदानी एनर्जी लिमिटेड आणि महावितरण जबाबदार असेल स्मार्ट मीटरची बिल अजिबात भरली जाणार नाहीत
शेतीपंपासाठी सोलर पंपाची सक्ती बंद करून विज कनेक्शन तात्काळ मंजूर करावीत
शेती पंप अनुदानातील मंजूर अधिभार आणि मागणी यातील तफावत दूर करून मोफत विज द्यावी अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याबाबतीत आज आजपर्यंत निदर्शने आंदोलन निवेदन वगैरे दिले तरीही मागण्या मान्य केल्या जात नसतील तर सरकार विरोधात मोर्चा काढून उत्तर देणार. त्यासाठी मंगळवार एक जुलै रोजी ठीक बारा वाजता जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयावर वीज ग्राहकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहावे असा आव्हान सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं
यावेळी सावकार मादनाईक, धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे ,दीपक पाटील विश्वास बालिघाटे,विक्रांत पाटील प्रवीण माने, आनील हुपरीकर शिवाजी काळे महादेव काळे जावेद मोमीन नागेश काळे इत्यादी उपस्थित होते.
स्मार्ट मीटर सक्ती विरोधात जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर एक जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चा ...
|