बातम्या
राष्ट्रीय बहुजन महासंघ व बौद्ध समाजमार्फत पन्हाळगडावरील सर्व विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार
By nisha patil - 2/1/2026 5:14:07 PM
Share This News:
राष्ट्रीय बहुजन महासंघ व बौद्ध समाजमार्फत पन्हाळगडावरील सर्व विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार
पन्हाळा प्रतिनिधी,शहाबाज मुजावर मुजावर दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून संध्याकाळी ७.०० वा राष्ट्रीय बहूजन महासंघ संघटना, महाराष्ट्र राज्य व पन्हाळा येथील बौद्ध समाजामार्फत समाजामधून चार नगरसेवक झाले आहेत त्यांच्या वतीने पन्हाळगडावरील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक,नगराध्यक्ष यांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह याठिकाणी करण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांची भोजनाची सोय सुद्धा करण्यात आली होती.
प्रस्तुत - दयानंद म्हैतर (सर) यांचा हाक बाबांची जागर प्रबोधनाचा हा कार्यक्रमाला प्रचंड गर्दी ने कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार विनयरावजी कोरे (सावकर) होते, त्यांच्या हस्ते सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सावकारांनी आपल्या पक्षाची भूमिका सांगितली. लोकशाहीत स्थानिक निवडणुकीत काही हेवेदावे झाल्या असतील तर ते विसरून सर्व आघाड्यांनी अपक्षाने मिळून चांगले काम करून दाखवावे त्यांना आमची पक्षाची साथ असेल तसेच राष्ट्रीय बहुजन महासंघाचे व बौद्ध समाजाचे सर्व नगरसेवकांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले .असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिव-शाहु आघाडीचे प्रमुख सतीश भोसले,जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते अँड राजेंद्र पाटील, तबरेज मुल्ला, संतोष चव्हाण, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, माजी नगरसेवक अँड,रवींद्र तोरसे तसेच सत्कार सोहळा वेळी गडावरील सर्वच नगरसेवक व नगराध्यक्षा उपस्थित होते, राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे, उपाध्यक्ष नंदकुमार कांबळे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख समीर गवंडी, अर्जुन कासे,अनुप गवंडी, प्रशांत गवंडी,विशाल कांबळे, सौरभ कासे ,इत्यादी उपस्थित होते.
राष्ट्रीय बहुजन महासंघ व बौद्ध समाजमार्फत पन्हाळगडावरील सर्व विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार
|