बातम्या
आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप; पत्नीला अन्याय झाल्याची तक्रार
By Administrator - 2/28/2026 4:23:36 PM
Share This News:
आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप; पत्नीला अन्याय झाल्याची तक्रार
भुदरगड पंचायत समितीकडे लेखी अर्ज; पारदर्शक चौकशी करून न्याय देण्याची मागणी
भुदरगड तालुक्यातील पांगिरे गावातील रहिवासी अनिल धुळप्पा भोसले यांनी आशा स्वयंसेविका पदाच्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या पत्नीवर अन्याय झाल्याचे नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी सौ. सुरेखा अनिल भोसले यांनी आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज दाखल केला होता. शासनाच्या जी.आर.नुसार गुणवत्तेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणे अपेक्षित असताना संबंधित कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भोसले यांनी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी करून पात्रतेची तपासणी करावी, तसेच जर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप; पत्नीला अन्याय झाल्याची तक्रार
|