ताज्या बातम्या

वैद्यकीय शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची जाणीवही महत्त्वाची — हसन मुश्रीफ

Along with medical education


By nisha patil - 2/8/2025 5:25:32 PM
Share This News:



वैद्यकीय शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची जाणीवही महत्त्वाची — हसन मुश्रीफ

संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पदवीदान सोहळा उत्साहात

महागाव, ता. २ ऑगस्ट: संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, महागाव येथे आयोजित पदवीदान समारंभात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज  पाटीलआमदार जयंत आसगावकर, आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ प्रमुख उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “डॉक्टर म्हणून घडताना आपल्या खांद्यावर फक्त शैक्षणिक नाही, तर लोकांच्या विश्वासाचीही मोठी जबाबदारी असते. प्रामाणिकपणा, नैतिकता, संवेदनशीलता आणि तंत्रज्ञानाचा सजग वापर ही काळाची गरज आहे.”समारंभात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
 

या कार्यक्रमाला बाळासाहेब चव्हाण, राजकुमार पाटील, यशवंत चव्हाण, संजय चव्हाण, प्रतिमा चव्हाण, सुरेखा चव्हाण, शशिकांत पाटील-चुयेकर यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वैद्यकीय शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची जाणीवही महत्त्वाची — हसन मुश्रीफ
Total Views: 144