बातम्या
अळूची पाने आरोग्यासाठी वरदान ! ‘हे’ फायदे जाणून घ्या.
By nisha patil - 5/17/2025 12:26:36 AM
Share This News:
अळूची पाने आरोग्यासाठी वरदान ! ‘हे’ फायदे जाणून घ्या.
अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे -
ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही.
वजन
यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पोटाच्या समस्या
पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते.
पूरळ
अळूची पाने जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्यास पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.
दृष्टी
यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.
सांधेदुखी
सांधेदुखीत दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्यास आराम मिळेल.
अळूची पाने आरोग्यासाठी वरदान ! ‘हे’ फायदे जाणून घ्या.
|