बातम्या
अंबप : ग्रामदैवत श्री नागनाथ देवालय येथे श्रावण महिन्यात भंडारा संपन्न
By nisha patil - 8/16/2025 10:04:32 PM
Share This News:
अंबप : ग्रामदैवत श्री नागनाथ देवालय येथे श्रावण महिन्यात भंडारा संपन्न
अंबप (ता. हातकणंगले) प्रतिनिधी किशोर जासूद : अंबप गावचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवालय येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा मान शिंदे समाजाकडे असून, परंपरेनुसार शिंदे समाजातील भाविक नागनाथाची मूर्ती बैलगाडीतून वाजतगाजत मंदिरात आणतात.

सकाळी धार्मिक विधी, पूजन-अर्चन, अभिषेक व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. गावकरी, भाविक तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्साहाने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साही वातावरणाने भारून गेला होता.

अंबप : ग्रामदैवत श्री नागनाथ देवालय येथे श्रावण महिन्यात भंडारा संपन्न
|