बातम्या

वंदना निवास दरवान यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ हजारांची मदत मंजूर — आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

Amal Mahadik

By nisha patil - 7/23/2025 4:07:06 PM
Share This News:

वंदना निवास दरवान यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ हजारांची मदत मंजूर — आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील वंदना निवास दरवान यांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹४५,००० (पंचेचाळीस हजार रुपये) आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत आमदार अमल महाडिक यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, त्यांच्या योगदानातून संबंधित निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरवान यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला होता. रुग्णाचे उपचार खर्च भागवण्यासाठी ही मदत मोठा आधार ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या नियमानुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दरवान कुटुंबीयांनी आमदार अमल महाडिक यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

वंदना निवास दरवान यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ हजारांची मदत मंजूर — आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश
Total Views: 68