बातम्या
अमल महाडिक यांच्या हस्ते २६/११ च्या शहीद वीरांना आदरांजली
By nisha patil - 11/26/2025 5:13:43 PM
Share This News:
अमल महाडिक यांच्या हस्ते २६/११ च्या शहीद वीरांना आदरांजली
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पाच शहीद—अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि तुकाराम ओंबाळे—यांच्या प्रतिमांचे पूजन करून अमल महाडिक यांच्या हस्ते त्यांना आदरांजली वाहिली.
या हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडताना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबाळे शहीद झाले होते. तसेच अशोक कामटे, हेमंत करकरे आणि विजय साळसकर यांच्या वाहनावर झालेल्या बेछूट गोळीबारात तिघांनी हौतात्म्य पत्करले. हॉटेल ताजमध्ये अडकलेल्या निरपराध नागरिकांना वाचवताना मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी अतुलनीय धैर्य दाखवत वीरमरण स्वीकारले.
अमल महाडिक यांनी या पाच वीरांसह महाराष्ट्र पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलातील सर्व शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
अमल महाडिक यांच्या हस्ते २६/११ च्या शहीद वीरांना आदरांजली
|