बातम्या

स्मॅकच्या चेअरमनपदी जयदीप चौगले

Amal chearman jaydip chaugule


By nisha patil - 10/29/2025 10:29:39 AM
Share This News:



स्मॅकच्या चेअरमनपदी जयदीप चौगले

भरत जाधव व्हाईस चेअरमनपदी निवडून

शिरोली औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)च्या २०२५-२६ वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

चेअरमनपदी जयदीप जयसिंगराव चौगले (चौगुले सिमेंट पाईप कंपनी) तर व्हाईस चेअरमनपदी भरत परशुराम जाधव (सरोज ग्रुप ऑफ कंपनीज) यांची सर्वानुमते निवड झाली.

सेक्रेटरी रणजित चंद्रकांत जाधव, ट्रेझरर बदाम लक्ष्मण पाटील, आयटीआय अध्यक्ष प्रशांत शेळके, आणि क्लस्टर अध्यक्ष सुरेश चौगुले यांची निवड झाली.

नूतन चेअरमन चौगले यांनी उद्योगांच्या प्रगतीसाठी नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला.


स्मॅकच्या चेअरमनपदी जयदीप चौगले
Total Views: 58