बातम्या

मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमल महाडिक यांचा ७५ हजार कापडी पिशव्यांचा संकल्प

Amal mahdik१

By nisha patil - 9/17/2025 3:18:53 PM
Share This News:

मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमल महाडिक यांचा ७५ हजार कापडी पिशव्यांचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी ७५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात या पिशव्यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या पिशवीमध्ये संविधान प्रस्तावना, तिरंगा झेंडा आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश देणारे साहित्य ठेवण्यात आले असून मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पिशव्या पोहोचविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी व प्लास्टिकविरहित समाजासाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमल महाडिक यांचा ७५ हजार कापडी पिशव्यांचा संकल्प
Total Views: 64