ताज्या बातम्या
अंबाबाई भक्तनिवासाचे काम पुन्हा चर्चेत; जिल्हाधिकाऱ्यांचा ठेकेदाराला अंतिम इशारा
By nisha patil - 7/31/2025 12:01:54 PM
Share This News:
अंबाबाई भक्तनिवासाचे काम पुन्हा चर्चेत; जिल्हाधिकाऱ्यांचा ठेकेदाराला अंतिम इशारा
सहा वर्षांची प्रतिक्षा संपणार? जिल्हाधिकाऱ्यांची भक्तनिवास पूर्णतेसाठी सहा महिन्यांची मुदत
कोल्हापूरच्या ताराबाई रोडवरील अंबाबाई भक्तनिवास प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून अपूर्णच आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून उभारल्या जाणाऱ्या या सात मजली इमारतीसाठी २०१९ मध्ये पॅराडाईज डेव्हलपर्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले. पण कोरोनाच्या कारणामुळे सुरुवातीला काम थांबले, त्यानंतर मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच कामात विलंब होत राहिला.
या रखडलेल्या कामाबाबत अखेर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी कडक पवित्रा घेतला. ठेकेदार आणि अभियंत्यांची बैठक घेऊन, “पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण झाले पाहिजे,” असा स्पष्ट आदेश दिला. यापूर्वी अनेक वेळा नोटिसा दिल्यानेही काहीच फरक पडला नव्हता. आता जिल्हाधिकाऱ्यांचा ‘शेवटचा इशारा’ ठेकेदार गांभीर्याने घेतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अंबाबाई भक्तनिवासाचे काम पुन्हा चर्चेत; जिल्हाधिकाऱ्यांचा ठेकेदाराला अंतिम इशारा
|