बातम्या
श्रावण सोहळ्यात अंबादास कुंभार यांना "आदर्श शेतकरी" पुरस्काराने गौरव
By nisha patil - 8/25/2025 4:35:11 PM
Share This News:
श्रावण सोहळ्यात अंबादास कुंभार यांना "आदर्श शेतकरी" पुरस्काराने गौरव
डफळापूर : श्रावण मास अखंड हरिनाम व विणा सोहळ्याच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त डफळापूर येथे आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात सद्गुरू बाळासाहेब देहुकर महाराज यांच्या शुभहस्ते लिंगायत कुंभार समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी अंबादास कुंभार, डफळापूर यांना "आदर्श शेतकरी" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागात शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून तसेच समाजकार्याच्या माध्यमातून गावोगावी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या अंबादास कुंभार यांच्या कार्याची या प्रसंगी दखल घेण्यात आली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शेती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, असा संदेश शेतकरी बांधवांना मिळाला आहे.
या सन्मानाबद्दल हिंदकेसरी साहित्य मंच कवठे पिरान व साप्ताहिक कुंभ शिल्प परिवार यांनी अंबादास कुंभार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमाला डफळापूर परिसरातील संत, महंत, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनाम व विणा सोहळ्याचा अध्यात्मिक माहोल आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाचा हा सोहळा उत्साहात पार पडला.
श्रावण सोहळ्यात अंबादास कुंभार यांना "आदर्श शेतकरी" पुरस्काराने गौरव
|