शैक्षणिक
सौ. आंबुबाई पाटील स्कूलमध्ये मिलिटरी व स्काऊट-गाईड कॅम्पचा उत्साही शुभारंभ
By nisha patil - 10/28/2025 10:44:09 AM
Share This News:
गोकुळ शिरगाव (दि. २७ ऑक्टोबर २०२५) — सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे पाच दिवसीय “मिलिटरी ट्रेनिंग व स्काऊट-गाईड कॅम्प” चा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला मा. श्री. सुभाष चौगुले (सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ कोल्हापूर), मा. श्री. शशिकांत खोत, मा. श्री. व्ही. एम. किल्लेदार, मा. सौ. सारिका कासोटे, मा. श्री. सागर पाटील, मा. श्री. सुदर्शन खोत, मा. श्री. अर्जुन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. एनसीसी विद्यार्थ्यांनी संचलन व प्रात्यक्षिक सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, एकात्मता आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शोभा पाटील यांनी, सूत्रसंचालन सौ. निर्मला केसरकर यांनी, तर आभार प्रदर्शन सौ. एस. के. पाटील यांनी केले. संस्थापक श्री. के. डी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाच दिवसीय निवासी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
सौ. आंबुबाई पाटील स्कूलमध्ये मिलिटरी व स्काऊट-गाईड कॅम्पचा उत्साही शुभारंभ
|