बातम्या

सौ. अंबुबाई पाटील स्कूलमध्ये क्रिडा महोत्सव जल्लोषात संपन्न

Ambubai patil sports


By nisha patil - 11/22/2025 10:27:46 PM
Share This News:



सौ. अंबुबाई पाटील स्कूलमध्ये क्रिडा महोत्सव जल्लोषात संपन्न

सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी “क्रिडा महोत्सव उद्घाटन सोहळा” उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय लेफ्टनंट कर्नल  अंशुमन पाटील (५ मराठा बटालियन, एनसीसी ऑफिसर, कोल्हापूर), माननीय  विलास पाटील (सेवानिवृत्त उपप्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, पलूस) तसेच माननीय  चंद्रकांत डावरे (लोकनियुक्त सरपंच, गोकुळ शिरगाव) उपस्थित होते.

तसेच  विलास घोडसे सर, प्रकाश तारदाले सर, . सुनील पाटील सर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी माननीय संस्थापक  के. डी. पाटील, प्राचार्य तेजस पाटील, व्हाईस प्रिन्सिपल सौ. एन. बी. केसरकर, मुख्याध्यापिका सौ. एस. के. पाटील, सर्व समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण झाली. एनसीसी विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी कवायत, लाठी-काठी, झांज-लेझीम, एरोबिक्स, बॉल डान्स, योगासने, डंबेल्स, ओढणी डान्स, पिरॅमिड, स्केटिंग, कराटे अशा विविध आकर्षक सादरीकरणांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निर्मला केसरकर मॅडम यांनी केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संदेश दिले. शेवटी  के. डी. पाटील सरांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


सौ. अंबुबाई पाटील स्कूलमध्ये क्रिडा महोत्सव जल्लोषात संपन्न
Total Views: 66