शैक्षणिक

मलिग्रे येथे रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

Ambulance dedication ceremony held at Maligre


By nisha patil - 11/23/2025 12:15:58 PM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- मलिग्रे ता. आजरा येथील सन 2008-2009 सालातील दहावी बॅचच्या विध्यार्थ्यांनी पंचक्रोशीतील रूग्णाची होणारी अडचण लक्षात घेऊन सामाजिक जाणिव प्रगल्भ करीत, एकत्र येऊन वर्गणीच्या फंडातून, चक्क रूग्णवाहीका खरेदी करून, भावेश्वरी रूग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळा संपन्न केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या. प्रमुख पाहूणे केदारी रेडेकर विस्वस्त संस्थेचे सचिव अनिरुध्द रेडेकर यांच्या व कारखाना उपाअध्यक्ष सुभाष देसाई याच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.
सुत्रसंचालन व प्रास्ताविक संजय घाटगे यानी केले.
 यावेळी   अनिरुद्ध रेडेकर यांनी बोलताना म्हणाले की,दहावीच्या बॅचच्या वतीने जनतेची सेवा करण्यासाठी घेतलेल्या निर्णायाचे अभिनंदन करून  शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली तर एक  एक वर्षाचे उत्पन्न संपते. तर रूग्णवाहीकेसाठी आँक्सिजन सिलेंडर अत्याआवश्यक असून, तो आपल्या हाँस्पीटल मार्फत देण्याचे तसेच रुग्ण कै. केदारी रेडेकर हाँस्पीटलला आणल्यास शासकीय योजनेतून मोफत सेवा व रूग्णवाहीकेसाठी डिझेल देण्याचे आश्वासन दिले.

आजरा साखर कारखाना उपाअध्यक्ष सुभाष देसाई यांनी युवा नेतृत्व किशोर जाधव याच्या कार्याचा गौरव करत त्याच्या बॅचच्या विध्यार्थ्यांनी रूग्णसेवेचा वसा मानवतेला जोडणारा असलेचे सांगितलं. तर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यानी रूग्णाची सेवाही भगवंताची सेवा असून, अध्यात्मिक समाधानासाठी मंदीराची तर गुणवत्ता  पुर्ण प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे. यासाठी आदर्श शाळा व आरोग्य सेवा ह्या समाज उपयोगी असल्याचे या विध्यार्थ्यांनी कृतीतून दाखवल्याचे सांगितलं. सरपंच शारदा गुरव यांनी रूग्णवाहीका ही मलिग्रे गावच्या अभिमानाची गोष्ट असून, रग्णवाहीका नियमित रहाणे साठी देखभाल दुरुस्ती, डिझेल व चालक पगार यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे सांगितले.
 यानंतर आरोग्य सहाय्यक जे.एम. बोकडे, धीरज देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संगिता परमार, डॉ. संध्या राऊत, उपसरपंच चाळू केंगारे, पोलीस पाटील मोहन सावंत, माजी सरपंच अशोक शिंदे, गजानन देशपांडे, युवा नेते किशोर जाधव, महेश तर्डेकर, संदीप केंगारे, संतोष मराठे, मंगल पारदे, तालुका संघाचे संचालक भाऊ किल्लेदार, डॉ. सुदाम हरेर,डॉ. एम. आर.खवरे, सुभाष चौगले, जगन्नाथ बुगडे, सुनंदा बुगडे, बिपीन जाधव याच्यासह अंगणवाडी सेविका,मराठी शाळा शिक्षिका, विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार विश्वास बुगडे यांनी मानले.


मलिग्रे येथे रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
Total Views: 22