बातम्या
वक्फ कायद्यातील दुरुस्ती ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय : खा.धनंजय महाडिक
By nisha patil - 4/26/2025 2:52:05 PM
Share This News:
वक्फ कायद्यातील दुरुस्ती ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय : खा.धनंजय महाडिक
सकल हिंदू समाजाकडून खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार, मिरवणूक काढून गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ कायद्यात झालेली दुरुस्ती ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक असून, या निर्णयामुळे देशातील हिंदूंच्या मालमत्तांचे आणि हक्कांचे रक्षण होणार आहे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. सकल हिंदू समाजातर्फे त्यांचा मिरवणूक काढून, औक्षण व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
खासदार महाडिक म्हणाले की, वक्फ कायद्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होत होती. मोदी सरकारने त्यात दुरुस्ती करत हिंदूंना न्याय दिला. या विधेयकाचा उद्देश कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून, अमर्याद अधिकार रोखण्याकडे आहे.
या कार्यक्रमात रणजित पाटील-चुयेकर, संजय वास्कर, किरण घाटगे, राहुल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वक्फ कायद्यातील दुरुस्ती ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय : खा.धनंजय महाडिक
|