बातम्या

अमित शाहांचा कोल्हापूर दौरा पुन्हा रद्द! 16 नोव्हेंबरचा कार्यक्रमही रद्द झाल्याने चर्चांना उधाण!

Amit Shahs Kolhapur visit cancelled once again


By nisha patil - 12/11/2026 2:05:15 PM
Share This News:



अमित शाहांचा कोल्हापूर दौरा पुन्हा रद्द! 16 नोव्हेंबरचा कार्यक्रमही रद्द झाल्याने चर्चांना उधाण!

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचे भव्य भूमिपूजन होणार होते.
 

मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यातही अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा प्रकृतीच्या कारणास्तव रद्द झाला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता सलग दुसऱ्यांदा दौरा रद्द झाल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी अमित शाह यांचा पुणे दौरा नियोजित आहे. मात्र, १६ नोव्हेंबरचा कोल्हापूर दौरा नेमक्या कोणत्या कारणामुळे रद्द झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच हुपरीतील नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


अमित शाहांचा कोल्हापूर दौरा पुन्हा रद्द! 16 नोव्हेंबरचा कार्यक्रमही रद्द झाल्याने चर्चांना उधाण!
Total Views: 23