बातम्या

अमजद माणगांवकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

Amjad mangavkar


By nisha patil - 1/6/2026 2:27:45 PM
Share This News:



**अमजद माणगांवकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड*

आजरा(हसन तकीलदार)*:-आजऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते अमजद माणगांवकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.

 पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, नाम. प्रकाश आबिटकर यांचेकडून भुदरगड व आजरा तालुक्यातील एकूण 219 व्यक्तींच्या नावांची शिफारस करणेत आलेली यादी प्राप्त झाल्यानुसार या दोन्ही तालुक्यातील 219 व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीसाठी शिफारस केल्यानुसार अमजद महंम्मदगौस माणगांवकर यांची आजरा शहर, विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करणेत आली आहे.

    अमजद माणगांवकर हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत पालकमंत्री नाम. आबिटकर यांनी माणगांवकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. त्याचप्रमाणे अमजद माणगांवकर हे नाम. प्रकाश आबिटकर यांचे जवळचे व कट्टर कार्यकर्ते आहेत.

    निवड झालेनंतर मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक असिफ सोनेखान, नगरसेवक असिफ पटेल, शिंदे गट कार्यालय प्रमुख संतोष भाटले, शहर प्रमुख शिंदे गट विजय थोरवत, संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिमभाई इंचनाळकर आदिजण उपस्थित होते.


अमजद माणगांवकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
Total Views: 317