बातम्या

अमृत दुर्गोत्सव 2025ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Amrit Durgotsav 2025 entered the Guinness World Records


By nisha patil - 11/11/2025 5:44:32 PM
Share This News:



अमृत दुर्गोत्सव 2025ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
 

मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम

कोल्हापूर, दि. 11 : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या उपक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे.

मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीमध्ये हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. शिवछत्रपतींशी संबंधित लोकसहभागातून गड-दुर्गांचा सन्मान करणारा हा पहिलाच विश्वविक्रम ठरला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या जगप्रसिद्ध संस्थेने अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना या विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.

अमृत दुर्गोत्सव 2025 शिवप्रेरणेने भारलेला असून या उपक्रमात अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील राज्ये, अमेरिका, इंग्लंड, आखाती देशांमधूनही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या लोकसहभागामुळे या उपक्रमाला खऱ्या अर्थाने लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले.


अमृत दुर्गोत्सव 2025ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Total Views: 37