बातम्या
कानोली विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात
By nisha patil - 11/10/2025 3:16:17 PM
Share This News:
कानोली विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात
संस्थेची ७५ वर्षांची वाटचाल गौरवस्पद – मंत्री हसन मुश्रीफ
कानोली (ता. आजरा) : स्वातंत्र्यानंतर लगेच स्थापन झालेल्या कानोली सहकारी विकास सेवा संस्थेची ७५ वर्षांची वाटचाल अत्यंत गौरवस्पद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी संस्थेने जास्तीत जास्त कर्जपुरवठा करून ग्रामीण विकासात मोठा वाटा उचलल्याचे त्यांनी सांगितले.
कानोलीतील अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेने दीड कोटी रुपयांचा अर्थपुरवठा, दीड लाखांचा नफा आणि ९९ टक्के वसुली साध्य केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी आजरा तालुका आगामी पुनर्रचनेत कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट व्हावा, अशी मागणी केली.
कार्यक्रमाला मुकुंददादा देसाई, प्रकाशभाई पताडे, अंजना रेडेकर, राजेंद्र मुरकुटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत राजेंद्र मुरकुटे, प्रास्ताविक परशुराम आपगे, सूत्रसंचालन जनार्दन बामणे, तर आभार पंडित पाटील यांनी मानले.
कानोली विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात
|