राजकीय
अमृता डोंगळे यांच्या विजयाचा निर्धार -हसन मुश्रीफ
By nisha patil - 11/17/2025 12:09:11 PM
Share This News:
भोगावती :अमृता डोंगळे या उच्चशिक्षित असून त्यांनी डोंगळे घराण्याचा समाजकार्याचा वारसा जोपासलेला आहे.म्हणून त्या कसबा तारळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत.ही खात्री असल्याने त्यांना मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार असा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘प्रवास भक्तीचा’ या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते.
राधानगरीच्या दुर्गम भागातील महिलांना 'युवाशक्ती'चे तीर्थाटन! अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.धकाधकीच्या जीवनातील कामाच्या ताणातून महिलांना थोडा विसावा मिळावा आणि त्यांना एक वेगळा अनुभव घेता यावा या उद्देशाने अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी एका विशेष भक्तिमय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीमुळे महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून, आगामी जिल्हा परिषद (जि. प.) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
तुळजापूर (तुळजाभवानी देवीचे दर्शन), अक्कलकोट (श्री स्वामी समर्थांचे दर्शन) आणि पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन) या तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन महिलांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करून एक नवा 'भक्तिमय' अध्याय सुरू 'युवाशक्ती'ने सुरू केला आहे.
यावेळी अरुण डोंगळे,भैय्या माने,प्रकाश गाडेकर,शितल फराकटे,अभिषेक डोंगळे,अमृता डोंगळे,संदिप ढेकळे,सम्राट डोंगळे,युवाशक्ती चे अध्यक्ष सुहास डोंगळे,संग्राम मगदूम,लक्ष्मण धनवडे आदींसह कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृता डोंगळे यांच्या विजयाचा निर्धार -हसन मुश्रीफ
|