बातम्या

१ कोटी ७८ लाखांची रक्कम परत मिळवून दिली.

An amount of Rs 1 crore 78 lakhs was recovered


By nisha patil - 6/19/2025 7:06:31 PM
Share This News:



१ कोटी ७८ लाखांची रक्कम परत मिळवून दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

गांधीनगर पोलीस ठाण्यातील आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात तब्बल १ कोटी ७८ लाख रुपये परत मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक यागेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला.या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक गुप्ता साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १ लाख रुपयांची रोख पारितोषिक रक्कम देऊन सत्कार केला. गुन्हे उघडकीस आणण्याच्या आणि जनतेच्या विश्वासाला सिद्ध करणाऱ्या पोलिसांच्या कार्यक्षमतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय तत्परतेने तपास करत केवळ आरोपींना अटक केली नाही, तर गुन्ह्यातील संपूर्ण रक्कमही परत मिळवून देण्यात यश मिळवलं आहे.
या यशस्वी कारवाईमुळे कोल्हापूर पोलिसांची विश्वासार्हता अधिक बळकट झाली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


१ कोटी ७८ लाखांची रक्कम परत मिळवून दिली.
Total Views: 88