बातम्या

सैनिक टाकळी परिसरामध्ये ऊस आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जागरसभा संपन्न .

An awareness meeting was held in the Sainik Takli


By nisha patil - 10/15/2026 11:14:28 PM
Share This News:



सैनिक टाकळी परिसरामध्ये ऊस आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जागरसभा संपन्न .
 

 चालू वर्षी पहिली उचल 5000 आणि मागील हंगामाचा हिशोब करून दुसरा हप्ता देत नाहीत तोपर्यंत उसाला कोयता नाही ..  

सुरू असलेल्या ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सैनिक टाकळी मध्ये बुधवारी सायंकाळी सात वाजता बस स्टँड चौकामध्ये आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने ऊस उत्पादकाची जागर सभा घेण्यात आली. सभेला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सभेचे अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी रामदास पाटील हे होते तर सभेचे  स्वागत व प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले .

 

 सभेला मार्गदर्शन करताना आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील साखरेचा दर गृहीत धरता उसाला पहिली उचल 5000 मिळाली पाहिजे व मागील गळीत हंगामामध्ये साखर  बग्यास मळी इत्यादी उप पदार्थांना चांगले दर मिळाल्या असल्यामुळे हिशोब करून दुसरा हप्ता मिळाला पाहिजे.
 

चालू वर्षी उसाची टंचाई असल्यामुळे ऊस आंदोलनाला योग्य संधी आहे त्यामुळे टाकळी परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात झोकून द्यावं तर चार पैसे पदरात पडतील अन्यथा नाही.
ऊस दर परवडत नसल्यामुळे तरुण शेतकरी ऊस शेतीमध्ये यायला तयार नाही त्यामुळे ही लूट थांबवायचे असेल तर तरुण शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरावे चालू वर्षी पोषक परिस्थिती असल्यामुळे ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय कोणी ऊस तोडी स्वीकारू नयेत आणि कुठे जबरदस्तीने ऊस वाहतूक   होत असेल तर ती रोखा,  असे आवाहन दीपक पाटील यांनी ऊस उत्पादकांना संबोधित करताना केले. 
 

तसेच अरुण पाटील,  प्रकाश खोत, विजय पाटील  अमर पाटील यांनी  ऊसदराच्या आंदोलनाबाबत आपली मनोगते व्यक्त करत आंदोलन अंकुश संघटनेच्या रविवारी 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी चौक शिरोळ या ठिकाणी होणाऱ्या ऊस परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला. सभेला उपस्थितांचे आभार अमर पाटील यांनी मानले.
(यापूर्वीचा जुन्या काळातील अनुभव लक्षात घेता शिरोळ तालुक्याच्या आमदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीनी ऊस दराचा  तोडगा काढताना पुढाकार  घेतला आहे पण गेली दोन टर्म आमदार असलेले शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायचं धोरण अवलंबत आहेत.

 

 गेल्या वर्षी आंदोलनात ठरलेले शंभर रुपये अध्यापि त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. तसेच चालू वर्षी सगळ्यात पहिल्यांदा उसाची मुळी टाकून शेतकऱ्याचे अन्नातमाती कालवण्याचा प्रकार आमदारांनी केलेल्या या घटनेचा निषेध सर्वांनीच व्यक्त केला आणि येत्या काळामध्ये आमदारांनी शेतकऱ्यांच्या नाकावर टिचुन  कारखाना चालू करायचा प्रयत्न केल्यास पहिला आंदोलन शरद कारखान्याच्या गेटवर होईल .सैनिक टाकळीच्या सैनिकी परंपरेनुसार परिसरातील माजी सैनिक आणि शेतकरी जय जवान व जय किसान या वचनाला स्मरून आंदोलनात पुढे असतील असा इशारा यावेळी देण्यात आला .)
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आत्माराम पाटील, ऐ वाय पाटील,  भीमराव माने ,अरुण पाटील, सिद्धू पाटील, विजय पाटील, संजय सूर्यवंशी, हनमंत पाटील, नवनाथ पाटील, अमर वासमकर, अरिहंत शिरहट्टी, नितीन पाटील, सचिन वाणी, प्रदीप पाटील, राजेश कदम, तानाजी पाटील ,संतोष मिरजे, विनायक पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय पाटील विशाल पाटील सुदीप पाटील इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सैनिक टाकळी परिसरामध्ये ऊस आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जागरसभा संपन्न .
Total Views: 6