बातम्या

पंत वालावलकर हायस्कूलचा "प्रकाश"मय उपक्रम ; पालकांनी मानले शाळेचे आभार    

An enlightening initiative by Pant Valavalkar High School


By nisha patil - 11/11/2026 5:30:33 PM
Share This News:



पंत वालावलकर हायस्कूलचा "प्रकाश"मय उपक्रम ; पालकांनी मानले शाळेचे आभार    
   

कोल्हापूर  :   आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक विश्वास माळी यांच्या कार्यशाळेत टाकाऊतून टिकाऊ कलाकृतीची निर्मिती करीत घरातून आणलेल्या जुन्या पणत्यांना  नवनिर्मितीचा साज देवून त्यावर आकर्षक सजावट करून पुन्हा त्या घरी नेऊन पालकांसोबत पणत्या प्रज्वलीत करून दिवाळी आणि दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत केला .

संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आणि शाळेच्या आवाहनानुसार या कार्यशाळेत उच्चप्राथमिक गटातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते . या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गतवर्षी वापरलेल्या मातीच्या पणत्या आणून त्यावर जलरंगाने ब्रशच्या सहाय्याने आकर्षक सजावट केली होती . आपण आपल्या पाल्याला दिलेल्या पणत्या याच होत्या का असा कुतूहलमिश्रीत प्रश्न अनेक पालकांना पडला . अनेक पालकांनी ही कलाकृती संग्रहित ठेवण्यात धन्यता मानली . अनेक विद्यार्थ्यांनी जादा पणती आणून ती रंगवून ज्या विद्यार्थ्यांनी पणती आणली नाही त्यांना भेट स्वरूपात दिली . 
       

कलाशिक्षक विश्वास माळी यांनी पणती रंगवणे याबरोबरच आकाशकंदील तयार करण्याचीही कार्यशाळा घेतली यामध्येही विद्यार्थी आकाशकंदील निर्मितीचे साहित्य घेऊन आले होते . विविधरंगी, बहुविध आकाराचे मनमोहक आकाशकंदील पाहून अनेक पालकांनी विकतच्या आकाशकंदीलापेक्षा आपल्या पाल्याकडून तयार झालेल्या या आकर्षक आणि विलोभनीय आकाशकंदिलात बल्ब सोडून तो प्रकाशमान करून दिवाळी अधिक चैतन्यदायी अन् प्रकाशमान केली.

या दिव्याप्रमाणेच स्वतः प्रकाशमान होवून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरण्याचा संकल्पच जणू पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला . प्रकाशमान पणती, प्रकाशमान आकाशकंदील पाहून हाच या दीपोत्सवाचा खरा अर्थ असल्याचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले . मनातील अंधःकार दू्र करण्यासाठी, निराशेवर मात करून हा प्रकल्प म्हणजे मन प्रसन्न करण्यासाठीचा अनोखा उपक्रम असल्याचे मत पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनी व्यक्त केले . विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबाबत पालकांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . या उपक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, अध्यक्षा सुचेता कोरगांवकर, संजीवभाई परीख यांसह सर्व पदाधिका ऱ्यांचे प्रोत्साहन लाभले . प्रकल्प यशस्वितेसाठी सहशिक्षक बाळासाहेब कागले, निर्मला शेळके, राजेंद्र बनसोडे, काजल चव्हाण, शीतल अलमान, प्रशांत भोसले, जयवंत साखरे, संजीत सनगर, प्रमोद कुलकर्णी, संतोष पोवार, सागर वाडकर यांचे सहकार्य लाभले


पंत वालावलकर हायस्कूलचा "प्रकाश"मय उपक्रम ; पालकांनी मानले शाळेचे आभार    
Total Views: 19