शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयात विविध देशांचे चलन प्रदर्शन संपन्न

An exhibition of currencies from various countries was held at Shahaji College


By nisha patil - 5/2/2026 2:41:54 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात विविध देशांचे चलन प्रदर्शन संपन्न 

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने चलनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये देशी व विदेशी अशा 41 देशांच्या चलनांचा समावेश करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ.आर. के.शानेदिवाण  यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ. ए. एम. गुरव , आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर , सहसमन्वयक डॉ. ए.बी. बुलगुडे,स्टाफ सेक्रेटरी डॉ.डी के वळवी, महाविद्यालयातील  प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थिनी  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.एस. राठोड यांनी केले. आभार डॉ. डी.पी.गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अर्जुन कांबळे यांनी  केले.  
           श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.


शहाजी महाविद्यालयात विविध देशांचे चलन प्रदर्शन संपन्न
Total Views: 20