बातम्या
कोल्हापूर महावितरणचा अभिनव उपक्रम!
By nisha patil - 7/15/2025 12:18:15 PM
Share This News:
कोल्हापूर महावितरणचा अभिनव उपक्रम!
एकाच दिवशी 30 ठिकाणी ग्राहक मेळावे;
496 तक्रारींचे जागेवर निराकरण
कोल्हापूर | 15 जुलै 2025 महावितरण कोल्हापूर मंडळाच्यावतीने आज दिनांक 14 जुलै रोजी ग्राहकांचे प्रश्न थेट त्यांच्या दारी सोडवण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मंडळातील एकूण 30 उपविभाग व 6 विभागांतर्गत एकाच दिवशी ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले.

या उपक्रमात एकूण 585 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तब्बल 496 तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. उर्वरित 89 तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे.

ग्राहक मेळाव्यात मुख्यतः खालील बाबींवर तक्रारी व मागण्या आल्या:
🔹 स्मार्ट मीटरबाबत शंका व तांत्रिक अडचणी
🔹 शेती ग्राहकांच्या HP मध्ये वाढ व HP कमी करण्याची मागणी
🔹 कृषी सोलर पंपविषयक अडचणी
🔹 नवीन वीज जोडणी
🔹 वीज बिल संबंधी तक्रारी

विशेषतः स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींसाठी प्रात्यक्षिकाद्वारे शंका निरसन करण्यात आले, याला उपस्थित ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्राहक मेळाव्याचे काही ठळक ठिकाणे पुढीलप्रमाणे:
📍 उत्तूर (आजरा उपविभाग)
📍 कदमवाडी उपविभाग
📍 इचलकरंजी विभागीय कार्यालय
📍 शाहूवाडी उपविभाग
📍 पश्चिम उपविभाग
📍 परिते उपविभाग

इचलकरंजीत झालेल्या मेळाव्यात पॉवरलूम असोसिएशनच्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदवला. तसेच, AMISP अंतर्गत Secure Meter च्या मदतीने स्मार्ट मीटर तपासणीसाठी Meter Testing Bench देखील उभारण्यात आले.
.%5B1%5D.jpg)
महावितरणच्या ग्राहकाभिमुख सेवेचा भाग म्हणून अशा प्रकारचे मेळावे दर पंधरवड्याला घेण्यात येणार असल्याचे कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी सांगितले.
कोल्हापूर महावितरणचा अभिनव उपक्रम!
|