बातम्या
कोल्हापूरात बेवारस इसमाचा मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू
By nisha patil - 8/19/2025 6:42:09 PM
Share This News:
कोल्हापूरात बेवारस इसमाचा मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू
कोल्हापूर | प्रतिनिधी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळजाभवानी मंदिरासमोर भवानी मंडप परिसरात एक बेवारस इसम बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी घडली.
मृत इसमाचे अंदाजे वय ५५ वर्षे असून, तो पूस्य जातीचा भटका फिरस्ता होता. त्याने अंगात निळ्या रंगाचा चौकटीचा शर्ट व काळपट रंगाची पँट परिधान केली होती. छातीवर ऑपरेशनचे जुने व्रण (खुणा) असल्याचे आढळून आले आहे. इसमाचे नाव-पत्ता अद्याप समजू शकलेले नाही.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. एम. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. संबंधित इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरात बेवारस इसमाचा मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू
|