बातम्या

आंदोलनाचा तिसरा दिवस.. भर पावसात हलगीनाद आंदोलन सुरूच

Andolam


By nisha patil - 2/7/2026 3:43:46 PM
Share This News:



**आंदोलनाचा तिसरा दिवस.. भर पावसात हलगीनाद आंदोलन सुरूच*

**अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? अशा संतप्त प्रतिक्रिया*

*आजरा(हसन तकीलदार)*:-आंबे ओहोळ धरणग्रस्तांचा आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आंदोलनाची दखल न घेण्याचा तहसील कार्यालयाचा पवित्रा कायम आहे त्यामुळे आंदोलन स्थळी अनेक संघटनांचे प्रतिनिधी शासनाचा निषेध नोंदवत पाठिंबा देत आहेत.

          भर पावसात आंदोलनाचा आज तिसरा दिवस. मुसळधार पावसात आंदोलन सूरु आहे परंतु संबंधित अधिकारी डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी तयार नाहीत त्यामुळे इतर संघटनाचे पदाधिकारी आंदोलन स्थळी भेट देऊन निषेध नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडत असताना शिवाजी गुरव म्हणाले की,सध्या चालू असलेले आंदोलन हे पुनर्वसनामध्ये मिळालेल्या जमिनीवर बेकायदेशीर बोजा चढवल्याने चालू आहे आज पर्यंत जमीन वाटप आदेश काढलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष माननीय जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख साहेब तसेच ॲडिशनल कलेक्टर पवार साहेब व अन्य अधिकाऱ्यांनी जे जे जमीन वाटपाचे आदेश काढले आहेत त्यामध्ये शेतकऱ्याकडून इतकी रक्कम येणे आहे असा कॉलम कधीच ठेवला नाही कारण प्रकल्पग्रस्ताची संपादन केलेली जमीन त्या जमिनीचे 65 टक्के भोगवट्याची रक्कम म्हणून शासनाकडे जमा केल्याने मिळालेल्या जमिनीवर बोजा चढवण्याचा किंवा स्वतंत्र कॉलम राखण्याचा प्रश्नच येत नव्हता.मात्र 2017 सालामध्ये तत्कालीन प्रांताधिकारी यांनी चुकीचा कॉलम शेवटचा राखून ठेवला व मिळालेल्या जमिनीच्या किमतीच्या 65 टक्के रक्कम त्या रखान्यात ठेवले आहे महाराष्ट्रामध्ये असा कोणत्याही ठिकाणी बोजा सांगणारा कॉलम नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विनाअट जीआर प्रमाणे वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यात आली आहे.याची खातरजमा अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे पण ते करायला तयार नाहीत अजूनही त्यांना आम्ही वेळ देण्यास तयार आहोत पण इथले तहसीलदार अधिकारी किंवा प्रांताधिकारी संवाद साधायला तयार नाहीत त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असे त्यांनी सांगितले.


आंदोलनाचा तिसरा दिवस.. भर पावसात हलगीनाद आंदोलन सुरूच
Total Views: 141