बातम्या
बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाला 'आंदोलन अंकुश'चा पाठिंबा!
By nisha patil - 6/13/2025 9:48:50 PM
Share This News:
बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाला 'आंदोलन अंकुश'चा पाठिंबा!
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाच्या स्मरणासाठी नायब तहसीलदारांना निवेदन
शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मोझरी येथे गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आ. बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनाला ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने जोरदार पाठिंबा दर्शवला आहे.
संघटनेच्या वतीने आज नायब तहसीलदार कीर्ती पाटील यांना मुख्यमंत्री यांच्याविरोधात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावी, कर्जमाफी जाहीर करावी आणि शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाला 'आंदोलन अंकुश'चा पाठिंबा!
|