विशेष बातम्या
केडीसी बँकेच्या सभेत राधानगरी तालुक्याचा ठराव नोंद न झाल्याने संताप
By nisha patil - 9/9/2025 10:54:24 AM
Share This News:
केडीसी बँकेच्या सभेत राधानगरी तालुक्याचा ठराव नोंद न झाल्याने संताप
आम्ही लाडू चिवडा खायला आलो नाही.. सभासदांनी व्यक्त केला संताप
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राधानगरी तालुक्याच्या टेबलवर ठराव नोंदणीसाठी कर्मचारी नसल्याने सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला. इतर तालुक्यांच्या टेबलावर नोंदणी सुरू असताना राधानगरी टेबल रिकामे असल्यामुळे अनेक सभासद नाराज झाले.
"आम्ही लांबून लाडू-चिवडा खायला आलो नाही, आमच्या संस्थेचा ठराव नोंदवा," अशी प्रतिक्रिया संतप्त सभासदांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबद्दल निषेध नोंदवून ते निघून गेले. याबाबत विचारणा केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर चौकशी केली जाईल, असे सांगितले.
केडीसी बँकेच्या सभेत राधानगरी तालुक्याचा ठराव नोंद न झाल्याने संताप
|